OnePlus Nord CE5 – मिड-रेंजमध्ये दमदार परफॉर्मन्स, उत्तम कॅमेरा आणि Android 15 सह भन्नाट स्मार्टफोन!

OnePlus Nord CE5
OnePlus Nord CE5

OnePlus Nord CE5 हा OnePlus कंपनी तर्फे लाँच करण्यात आलेला नवीन स्मार्टफोन आहे जो 8 जुलै 2025 रोजी लॉन्च करण्यात आला. हा मोबाईल मिड-रेंज प्राईस रेन्ज मध्ये लाँच करण्यात आला असून त्यात Android 15 आणि OnePlus चं ColorOS 15 देण्यात आलं आहे. त्याची बॉडी , प्रोसेसर, कॅमेरा, डिस्प्ले आणि बॅटरी या सर्व बाबतीत तो ह्या प्राईस रेंज मध्ये एकदम दमदार फोन वाटत आहे .


Oneplus Nord ce5 Specs

📱 डिझाईन आणि बिल्ड क्वालिटी (Design and Build):

OnePlus Nord CE5 ची जाडी हि केवळ 8.2mm असून वजन 199 ग्रॅम आहे. त्यातच ह्या मोबाइल मध्ये IP65 रेटिंग दिलं गेलं आहे, म्हणजेच ह्यामुळे मोबाईल धूळ आणि पाण्यापासून संरक्षण मिळते. यामध्ये मोबाइल मध्ये Dual Nano-SIM सुविधा असून एक स्लॉट microSDXC कार्डसाठी शेअर्ड आहे. म्हणजे तुम्ही एक तर दोन सिम वापरू शकता किंवा एक सिम आणि मेमरी कार्ड असा पर्याय तुमच्या कडे आहे . ह्या मोबाइल मध्ये तुम्हाला रंगाचे पर्याय म्हणजे Marble Mist, Black Infinity, आणि Nexus Blue, जे स्टायलिश लुक देतात.


🔥 डिस्प्लेची गुणवत्ता (Display):

Nord CE5 मध्ये 6.77-इंचाचा Fluid AMOLED डिस्प्ले आहे, ज्यामध्ये तुम्हाला 1 बिलियन रंग, बघायला मिळणार आहे सोबतच तुम्हाला 120Hz रिफ्रेश रेट आणि HDR10+ सपोर्ट सुद्धा मिळणार आहे.
ह्या मोबाईल चे स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो ~89.7% आहे, ज्यामुळे ह्या मोबाईल ची स्क्रीन मोठी आणि immersive वाटते.
तसेच ब्राइटनेस बाबत खालील फिचर्स बघायला मिळतात :

  • नॉर्मल ब्राइटनेस: 800 nits
  • HBM: 1300 nits
  • पीक ब्राइटनेस: 1430 nits

डिस्प्लेला Mohs level 5 ग्लास प्रोटेक्शन आहे आणि हा मोबाईल Ultra HDR image playback ला सपोर्ट करतो ज्यामुळे तुमचा viewing Experience खूप येतो !


🔧 प्रोसेसर आणि परफॉर्मन्स (Processor & Performance):

oneplus nord ce5 price
oneplus nord ce5 price


OnePlus Nord CE5 मध्ये वापरण्यात आलेला MediaTek Dimensity 8350 Apex हा 4nm आधारित शक्तिशाली प्रोसेसर आहे. यामध्ये तीन प्रकारचे CPU कोअर्स आहेत – एक 3.35GHz Cortex-A715, तीन 3.20GHz Cortex-A715, आणि चार 2.20GHz Cortex-A510. यामुळे हा प्रोसेसर मल्टीटास्किंग आणि गेमिंगसाठी अत्यंत कार्यक्षम ठरतो. यासोबत Mali G615-MC6 हा GPU दिला गेला असून तो ग्राफिक्स हाताळण्यास समर्थ आहे.


💾 स्टोरेज पर्याय (Storage Options):


या फोनमध्ये तीन स्टोरेज कॉम्बिनेशन्स दिले आहेत – 128GB स्टोरेजसोबत 8GB RAM, 256GB स्टोरेजसोबत 8GB RAM आणि 256GB स्टोरेजसोबत 12GB RAM. हे सर्व पर्याय UFS 3.1 स्टोरेज तंत्रज्ञानावर आधारित असून जलद डेटा ट्रान्सफर आणि स्मूद परफॉर्मन्स देतात.


📸 कॅमेरा सिस्टम (Camera System):


फोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आहे. 50MP चा मुख्य कॅमेरा f/1.8 अपर्चरसह असून त्यात OIS (Optical Image Stabilization) आणि PDAF आहे. यासोबत 8MP चा अल्ट्रावाईड कॅमेरा दिला आहे ज्याचा फील्ड ऑफ व्ह्यू 112° आहे. हे कॅमेरे 4K @30/60fps आणि 1080p @30/60/120/480fps व्हिडीओ रेकॉर्ड करू शकतात. स्लो मोशनसाठी 720p @ 960fps चा सपोर्ट आहे.
फ्रंट कॅमेराची क्षमता 16MP असून तो 1080p @30/60fps व्हिडीओ रेकॉर्ड करू शकतो आणि पॅनोरमा मोडसारखे फीचर्सही यात आहेत.


🔊 ऑडिओ आणि कनेक्टिव्हिटी (Audio & Connectivity):


या फोनमध्ये लाउडस्पीकर आहे, पण 3.5mm हेडफोन जॅक दिलेला नाही. Bluetooth 5.4 (aptX HD, LHDC 5) आणि Wi-Fi 6 (ड्युअल बँड) सपोर्ट दिला आहे. याशिवाय GPS, GALILEO, GLONASS, BDS आणि QZSS यांसारखे नेव्हिगेशन सिस्टम्स दिले आहेत. USB Type-C 2.0 चार्जिंगसाठी वापरले जाते. Infrared पोर्टही यामध्ये आहे. मात्र, NFC आणि FM रेडिओचा अभाव आहे.

oneplus nord ce5 specs
oneplus nord ce5 specs

🔐 सेन्सर्स आणि सॉफ्टवेअर फिचर्स (Sensors & Features):


फोनमध्ये under-display फिंगरप्रिंट स्कॅनरसह Accelerometer, Gyro, Proximity आणि Compass सेन्सर्स आहेत. याशिवाय “Circle to Search” नावाचा खास फीचर देण्यात आला आहे, ज्याच्या मदतीने स्क्रीनवरून थेट इंटरनेट सर्च करता येतो.


🔋 बॅटरी आणि चार्जिंग (Battery & Charging):


फोनच्या ग्लोबल व्हर्जनमध्ये 5200 mAh बॅटरी दिली असून भारतात उपलब्ध व्हर्जनमध्ये 7100 mAh ची अधिक शक्तिशाली Si/C Li-Ion बॅटरी आहे. दोन्ही व्हर्जन्स 80W वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करतात. “Bypass Charging” नावाचे फीचर गेमिंगसाठी उपयुक्त असून हे चार्जिंगदरम्यान फोन गरम होण्यापासून प्रतिबंध करते.


📊 बेंचमार्क व परफॉर्मन्स टेस्ट्स (Benchmarks & Performance Tests):


AnTuTu (v10) बेंचमार्क स्कोअर 1,390,121 आहे, जो उच्च कार्यक्षमतेचे निदर्शक आहे. GeekBench (v6) मध्ये 4006 स्कोअर आहे, तर 3DMark (Wild Life Extreme) स्कोअर 3033 आहे.
Display Brightness 1231 nits पर्यंत आहे – ही स्क्रीन घराबाहेरही स्पष्ट दिसण्यास मदत करते. Loudspeaker ची ऑडिओ क्वालिटी -27.1 LUFS आहे जी “Good” म्हणून रेट केलेली आहे. Battery Endurance टेस्टमध्ये फोनने 14 तास 42 मिनिटांचा टाईम दिला आहे. Free Fall टेस्टमध्ये 300 वेळा पडूनसुद्धा फोन EU LABEL Class A मध्ये पास झाला आहे. रिपेअरबिलिटी स्कोअर Class B आहे.


neplus nord ce5 price

OnePlus Nord CE5 हा स्मार्टफोन 2025 साली मिड-रेंज प्राईस रेंज मध्ये एक उत्कृष्ट पर्याय ठरतो.
त्याचा प्रोसेसर Dimensity 8350 Apex, 50MP कॅमेरा, AMOLED डिस्प्ले, 80W फास्ट चार्जिंग, आणि Android 15 यामुळे तो परफॉर्मन्स आणि युटिलिटी यांचं उत्तम सांगड घालताना दिसत आहे.
₹24,998 च्या सुरुवातीच्या किमतीत,(oneplus nord ce5 price) हा फोन एक बेस्ट option आहे जर तुमचे बजेट २५ हजार रुपयांपर्यंत असेल तर ह्या मोबाईल बद्दल तुम्ही नक्की विचार करू शकता .


📲 सोशल मीडिया अपडेटसाठी आमच्यासोबत रहा:

Leave a Comment