
Nothing Phone 3 भारतीय बाजारात लाँच झाला आहे आणि ह्याच्या प्रिमिअम फीचर्स आणि दमदार लुक सोबत ह्या मोबाईल ने स्मार्टफोन मार्केटमध्ये आगळीवेगळी ओळख निर्माण केली आहे. Android 15 आणि Nothing OS 3.5 या स् सॉफ्टवेअरमुळे युजरला प्रीमियम अनुभव मिळतो. ह्या मोबाईल चा OLED डिस्प्ले, ट्रिपल 50MP कॅमेरा, आणि Snapdragon 8s Gen 4 प्रोसेसर यामुळे परफॉर्मन्सही जबरदस्त आहे. IP68 रेटिंग, वायरलेस चार्जिंग, आणि मागील Monochrome LED ग्लिफ फिचरमुळे हा फोन इतरांपेक्षा वेगळा ठरतो. ज्यांना एकदम स्टायलिश, मजबूत आणि दीर्घकालीन सपोर्टसह स्मार्टफोन हवा आहे, ते Nothing Phone 3 नक्की बघा.
Nothing Phone 3 Launch Date
Nothing तर्फे Nothing Phone 3 ची अधिकृत घोषणा 2 जुलै 2025 रोजी करण्यात आली होती . Nothing या कंपनीने त्यांच्या सोशल मिडिया चॅनेल्स आणि वेबसाईटवर या तारखेचा उल्लेख करून फोनचे डिज़ाइन, फायदे आणि अनोखे ग्लिफ इंटरफेस दाखवले होते . लाँच इव्हेंटमध्ये त्यांनी मुख्यत्वे Clean सॉफ्टवेअर, प्रीमियम बिल्ड क्वॉलिटी, आणि अधिक कालावधी करीत मिळणाऱ्या Android अपडेट्सवर भर दिला. टेक चाहत्यांनी या लाँचची उत्सुकतेने वाट पाहिली, कारण Nothing ने मागील मॉडेलमध्ये देखील वेगळे प्रयोग केले होते.
Nothing Phone 3 Release Date
Nothing Phone 3 भारतात 15 जुलै 2025 रोजी विक्रीसाठी उपलब्ध झाला. भारतात आणि परदेशात ऑनलाईन आणि ऑफलाईन प्री-बुकिंग सुरू झाली होती. काहीच दिवसांत बऱ्याच लोकांनी हा फोन बुक केला. चार्जिंग करताना सुद्धा हा मोबाईल खूप छान काम करतो आणि त्याचा डिस्प्ले Quality सुंदर आहे, त्यामुळे लोकांना तो खूप आवडला. रिटेल शॉप आणि ई-कॉमर्स वेबसाइट्सवर तो लवकरच आउट ऑफ स्टॉक झाला. लॉन्चच्या आठवड्यातच त्याचा खूप वेगाने विक्री झाली.
Nothing Phone 3 Pro Specifications

Nothing Phone 3 ची मुख्य वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत:
- डिस्प्ले: 6.67 इंचाचा OLED, 120Hz रिफ्रेश रेट, HDR10+ सपोर्ट, 4500 nits पीक ब्राइटनेस.
- बिल्ड क्वॉलिटी: Corning Gorilla Glass 7i फ्रंट, Gorilla Glass Victus बॅक, अलुमिनियम फ्रेम.
- प्रोसेसर: Qualcomm SM8735 Snapdragon 8s Gen 4 (4nm), Octa-core (3.21 GHz Cortex-X4 + 3×3.0 GHz Cortex-A720 + 2×2.8 GHz Cortex-A720 + 2×2.0 GHz Cortex-A720), Adreno 825 GPU.
- मेमरी: 256GB + 12GB RAM / 512GB + 16GB RAM (UFS 4.0).
- कॅमेरा:
- रिअर ट्रिपल 50MP: वाइड (f/1.7, OIS), टेलिफोटो (f/2.7, 3x ऑप्टिकल झूम), अल्ट्रावाइड (f/2.2, 114°).
- फ्रंट 50MP (f/2.2, 4K@60fps).
- सॉफ्टवेअर: Android 15 + Nothing OS 3.5, “up to 5 major Android upgrades.”
- कनेक्टिव्हिटी: Wi-Fi 6/7, Bluetooth 6.0, NFC, GPS L1+L5, USB-C OTG.
- बैटरी: 5150 mAh (इंटरनॅशनल) / 5500 mAh (इंडिया), 65W वायर्ड चार्जिंग, 15W वायरलेस, 7.5W रिव्हर्स वायर्ड, 5W रिव्हर्स वायरलेस.
- सेन्सर्स: अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट, अॅक्सेलेरोमीटर, प्रॉक्सिमिटी, ज्यरो, कम्पास.
- इतर: IP68 वॉटर/डस्ट रेसिस्टंट, मागील 489 LED ग्लिफ डिस्प्ले.
या सर्व फिचर्समुळे Nothing Phone 3 हा एक प्रीमियम, परफॉर्मन्स-ओरिएंटेड फोन ठरतो.

Nothing Phone 3 Price
Nothing Phone 3 च्या किंमती वैशिष्ट्यांनुसार थोड्या वेगवेगळ्या आहेत:
- 256GB + 12GB RAM: सुमारे ₹66,000
- 512GB + 16GB RAM: सुमारे ₹74,000
आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत US $799 / £799 / €799 इतकी आहे. किंमत पाहता, हा फोन त्याच्या फीचर्स आणि बिल्ड क्वॉलिटीच्या अनुषंगाने वाजवी वाटतो. भारतात कर आणि इतर कर ऍडजस्टमेंटनंतर किंमत काहीशा बदलू शकते, तरीही युवा वापरकर्त्यांसाठी हा खर्च परवडणारा आहे.
Nothing Phone 3 हे आधुनिक डिझाइन, दमदार परफॉर्मन्स, उत्कृष्ट कॅमेरा आणि स्वच्छ सॉफ्टवेअर अनुभव देणारे एक प्रीमियम स्मार्टफोन आहे. त्याचा Monochrome LED ग्लिफ डिस्प्ले, IP68 रेटिंग, आणि Snapdragon 8s Gen 4 प्रोसेसर यामुळे तो इतर high end मोबाईल ला टक्कर देण्या सारखा मोबाईल ठरतो . ज्यांना दीर्घकालीन अपडेट्स, फास्ट चार्जिंग आणि हटके लुक हवा आहे, त्यांच्यासाठी Nothing Phone 3 नक्कीच चांगला पर्याय ठरेल.
📲 सोशल मीडिया अपडेटसाठी आमच्यासोबत रहा:
- Youtube चॅनेल: Join Now
- WEBSITE : MobileKatta.com
- Instagram : Mobile Katta